Translate

हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026

हिंगोली पोलीस पाटील भरती 2026: ऑनलाईन अर्ज, जाहिरात व सूचना, Hingoli Police Patil Bharti 2026 – अधिकृत जाहिरात, अर्ज प्रक्रिया व महत्वाची सूचना

अर्ज प्रक्रियेतील पायऱ्या

वेळापत्रक

हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026

हिंगोली जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटील पदे भरण्यासाठी पोलीस पाटील पदभरती 2026 प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.

भरती प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती, पात्रता अटी, गावनिहाय पदसंख्या, निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क तसेच महत्त्वाच्या तारखा अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.


📢 महत्वाची सूचना

पोलीस पाटील भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदाकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पद्धतीनेच भरलेले अर्ज व विहित पद्धतीने भरलेल्या परीक्षा शुल्कासह अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती बाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

भरती प्रक्रिया / परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करणे तसेच आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पोलीस पाटील निवड समिती यांना राहील.


✅ उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज अमान्य ठरतील.
  • परीक्षा शुल्क योग्य पद्धतीने भरलेले असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रियेतील सर्व अद्ययावत सूचना संकेतस्थळावरच प्रसिद्ध केल्या जातील.

🔔 सूचना: उमेदवारांनी अफवा किंवा अनधिकृत संकेतस्थळांवर विश्वास ठेवू नये Offical Link- https://hingoli.nic.in

Post a Comment